विवोची आयपीएल चाहत्यांसाठी स्पेशल एडिशन


मुंबई: भारतात आता विक्रीसाठी विवो व्ही५ प्लस आयपीएल लिमिटेड एडिशन स्मार्टफोन उपलब्ध झाला असून या फोनची किंमत २५ हजार ९९० रूपये ऐवढी ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी कंपनीने ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टसोबत भागीदारी केली असून त्यासोबतच देशभरातील ऑफलाईन स्टोरमध्येही हा स्मार्टफोन मिळेल.

याबाबत कंपनीने माहिती देताना सांगितले की, कंपनीने स्पेशल एडिशन स्मार्टफोनची ही एक्सक्लूझिव रेंज क्रिकेट फॅन्स आणि आयपीएल लव्हर्सना वेगळा अनुभव देण्यासाठी सादर केली आहे. डिझाईनबद्दल सांगायचे तर हे एडिशन कंपनीच्या स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा बरच वेगळे आहे. यात नवा मॅटे ब्लॅक फिनिश आणि मागे १८ कॅरेट व्हिवो आयपीएल लोगो देण्यात आला आहे. बाकी इतर सगळे फिचर्स हे साधारण विवो व्ही५ प्लस स्मार्टफोनसारखेच देण्यात आले आहेत.

Leave a Comment