
मोटोरोला ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लेटेस्ट, आकर्षक व सहज परवडणारे स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी प्रसिद्ध आहेच. जी सिरीज मधील एकापेक्षा एक चांगले स्मार्टफोन सादर केल्यानंतर आता कंपनी ई सिरीजकडे वळली असून त्याअंतर्गत ई फोन प्लस व ई फोर असे दोन स्मार्टफोन लवकरच सादर करत असल्याचे समजते.
मोटोरोलाचा नवा ई फोर प्लस लवकरच येतोय
कंपनीने त्यांचे जी फाईव्ह व जी फाइव्ह प्लस नुकतेच सादर केले आहेत. ई फोर प्लससाठी ५ हजार एमएएच ची बॅटरी दिली जाणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत. त्यामुळे हा कंपनीचा आत्तापर्यंतचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असेल. फेडरल कम्युनिकेशन कमिशनकडून नवे उपकरण एकसटी १७७३ मॉडेलला सर्टिफिकेशन दिले गेले असल्याचेही सांगितले जात आहे. या फोनबरेाबरच ई फोर स्मार्टफोनही कंपनी सादर करेल असा अंदाज आहे. दोन्ही फोन अँड्राईड नगेट ७.० ओएस व फोर जी सपोर्टर असतील. गतवर्षी कंपनीने ई ३ पॉवर स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याला पाच इंची एचडी स्क्रीन दिला गेला होता.
