केवळ १ रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट डेटा देणार आयडिया


मुंबई – स्वस्तात मोबाईल इंटरनेट पॅकची ऑफर रिलायन्स जिओने उपलब्ध करुन दिल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये विविध ऑफर्स देण्याची स्पर्धा लागल्याचे पहायला मिळत आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येक टेलिकॉम कंपनी विविध ऑफर बाजारात उपलब्ध करुन देत आहेत. त्याच प्रकारे आता आयडियाने एक जबरदस्त ऑफर लाँन्च करत ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.

आयडिया कंपनीने आपली आयडिया वापरत धमाकेदार प्लॅन बाजारात उपलब्ध करुन दिला आहे. या ऑफरमध्ये कंपनीने ग्राहकांना केवळ १ रुपयांमध्ये अनलिमिटेड ४जी इंटरनेट डेटा उपलब्ध करुन दिला आहे. आयडिया कंपनीच्या या ऑफरनुसार ग्राहकांना केवळ १ रुपयांमध्ये अनलिमिटेड ४जी इंटरनेट डेटा मिळणार आहे. मात्र, या ऑफरमध्ये मिळणारा इंटरनेट डेटाची व्हॅलिडिटी केवळ एक तासच असणार आहे. ही ऑफर घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या आयडिया फोन नंबरहून ४११ नंबर डायल करावा लागणार आहे आणि त्यानंतर मिळणा-या इंस्ट्रक्शन्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

पण ही ऑफर घेताना तुमचा अकाऊंट बँलंस १ रुपयांपेक्षा अधिक असायला हवा. यानंतर तुम्ही एक तासाभरासाठी अनलिमिटेड ४जी इंटरनेट डेटाची सेवा अनुभवू शकाल. या ऑफरचा लाभ केवळ त्या यूझर्सला मिळणार आहे जे सध्या आयडियाचे ग्राहक आहेत आणि ज्यांच्याकडे ४जी स्मार्टफोनसोबत आयडियाचे ४जी सिमकार्ड आहे.

Leave a Comment