मेक इन इंडिया मोबाईल हँडसेट उत्पादनासाठी फायद्याची


सायबर मिडीया मार्केट रिसर्च फर्मने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार पंतप्रधान मोदींनी सत्तेवर येताच सुरू केलेले मेक इन इंडिया अभियान मोबाईल हँडसेट उत्पादनासाठी अतिशय यशस्वी ठरले आहे. सॅमसंग, इंटेकस व रायझिंग स्टार या देशात उत्पादन क्षेत्रातील तीन टॉप ओरिजिनल इकिवपमेंट उत्पादक कंपन्या ठरल्या आहेत. २०१६ च्या चौथ्या तिमाहीत भारतात ४८ ओईएम व थर्ड पार्टी उत्पादक कंपन्या हँडसेट उत्पादन करत आहेत.

या काळात मूळ डिझाईन उत्पादकांनी भारतातील जादा मागणी पूर्ण करण्यासाठी ब्रँड पुरवठा केला असून भारतात असेंबल करण्यासाठी विदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. सायबर मिडीयाचे प्रमुख फैसल काबूसा म्हणाले मेक इन इंडिया ही मोहिम मोबाईल हँडसेट उत्पादनांच्या दिशेने सकारात्मक ठरली आहे. सॅमसंग, इंटेक्स व विवो टॉपवर आहेत.रायझिंग स्टार आसुस, जिओनी, इनफोकस, मायक्रोसॉफ्ट, ओप्पो, शाअ्रोमी चे हँडसेट मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन करत आहे.

Leave a Comment