१ जीबी मोफत इंटरनेट देणार बीएसएनएल


मुंबई : जे ग्राहक इंटरनेटचा वापर करत नाहीत त्यांच्यासाठी खास डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी दूरसंचार कंपनी अर्थात भारत संचार निगम लिमिटेडने १ जीबी मोफत इंटरनेट डाटाची ऑफर दिली आहे. यासाठी ग्राहकाला बीएसएनएलचे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर हा मोफत डाटा मिळेल.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत तसेच ते बीएसएनएलची सेवा घेत आहेत. परंतु ते ग्राहक इंटरनेट वापरत नाही. त्यांना इंटरनेटशी जोडण्यासाठी १ जीबी डेटा मोफत दिला आहे. शिवाय या योजनेचा सर्व ग्राहकांना लाभ मिळणार आहे. बीएसएनएलने डिजिटल भारत ड्रायव्ह आणि प्रीपेड मोबाईल सेवा इंटरनेट वापरकर्ते वाढविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment