टाटाची स्टाईलीश टीगॉर लॉन्च


नवी दिल्ली : टाटाची टियागो हॅचबॅकवर बनलेली नवी कॉम्पॅक्ट सेडान टीगॉर लाँच झाली असून ४.७० लाख रूपयापासून याची किंमत सुरु होते जी ७.०९ लाख रूपयांपर्यंत जाते. या गाडीचे कमपेरिजन होंडा अमेज, हुंडई एक्सेंट, फॉक्सवेगन एमियो, मारूती सुझुकी स्विफ्ट डिजायर, फोर्ड फीगो एस्पायर आणि कॉम्पॅक्ट सेडान जेस्ट सोबत करता येणार आहे.

टीगॉरमध्ये पुढे ड्यूल-टोन बम्पर, नवी हनीकॉम्ब ग्रिल आणि ड्यूल-बॅरल हँडलेप्ससोबत स्मोक्ड प्रोजेक्टर हेडलाईट दिली गेली आहे. मागील बाजुला एलईडी टेललाइट आणि रेअर विंडशील्डवर एलईडी स्टॉप-लँप स्ट्रीप दिली गेली आहे. टीगॉरच्या पेट्रोल एक्सजेड वेरिएंटमध्ये १५ इंचचा अलॉय व्हील दिला गेला आहे. डिझेल व्हर्जनमध्ये टियागो प्रमाणे १४ इंचचा अलॉय व्हील दिला गेला आहे.

टीगॉरच्या केबिनमध्ये काही सेगमेंट फर्स्ट फीचर दिले गेले आहेत. टीगॉरमध्ये हारमनचे 8-स्पीकर्स (4 स्पीकर्स आणि 4 ट्विटर्स) वाले साउंड सिस्टम, ५.० इंचीचा इंफोटेंमेंट सिस्टम दिला गेला आहे. रिवर्स कॅमरा, वीडियो प्लेबॅक, वॉइस कमांड रिकग्निशन, जीपीएस नेविगेशन आणि एसएमएस रीड-आउटची सुविधा देखील देण्यात आली आहे. याशिवाय १२ वोल्टचे २ पावर सॉकेट आणि रियर आर्मरेस्टसोबत कपहोल्डर्सची सुविधा दिली गेली आहे. टीगॉरचा बूट स्पेस ४१९ लीटर आहे.

टीगॉरमध्ये टियागो हॅचबॅकचं पेट्रोल आणि डिझेल इंजन दिले गेले आहे,. पेट्रोल वर्जनमध्ये १.२ लीटरचे ३-सिलेंडर इंजिन दिले गेले आहे. जो ८५ पीएसची पावर आणि ११४ एनएमचे टॉर्क देतो. पेट्रोल वर्जनचे मायलेज हे २०.३ किमी प्रती लीटर तर डिझेल वर्जनमध्ये १.०५ लीटरचे ३-सिलेंडर इंजिन दिले गेले आहे,जो ७० पीएसची पावर आणि १४० एनएमचे टॉर्क जनरेट करते. डिझेल वर्जनचे मायलेज २४.७ किमी प्रती लीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. टीगॉरमध्ये दोन इंजिनसोबत ५-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्स दिला गेला आहे.

Leave a Comment