१ एप्रिलपासून महागणार वाहन, आरोग्य विमा


नवी दिल्ली – १ एप्रिलपासून मोटार, दुचाकी आणि आरोग्य विम्याचा हप्ता वाढणार असून एजंटांचे कमिशन वाढविण्याचा निर्णय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) घेतल्याने हप्ता महागणार आहे.

विमा हप्त्यात होणारा बदल एजंटांचे कमिशन वाढल्यामुळे अधिक अथवा उणे ५ टक्‍क्‍यांच्या आतमध्ये असेल. वाहनांच्या थर्ड पार्टी विमा हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. आता एजंटांचे कमिशन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यामध्ये आणखी वाढ होणार आहे. १ एप्रिलपासून आयआरडीएआय नियामक कायदा २०१६ हा लागू होत आहे.

एजंटांना देण्यात येणाऱ्या कमिशनचा आढावा आणि त्यांना बक्षीस देण्याची तरतूद या कायद्यात आहे. यामुळे विमा कंपन्यांना हप्त्यामध्ये वाढ करावी लागणार आहे. आधी विक्री केलेल्या विमा पॉलिसींसाठी हप्त्यामध्ये बदल होणार नाही, असे आयआरडीएआयने म्हटले आहे.

Leave a Comment