
नवी दिल्ली : आपल्या युर्जससाठी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुककडून अनेकदा नव-नवे तंत्रज्ञान असलेल्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. सध्या दोन नवे फिचर्स वाढवण्यात आले आहे. फेसबुक अॅपच्या टॉपला या नव्या फिचर्सच्या मदतीने फोटो लावता येणार असून, तो फोटो २४ तासांपर्यंत असणार आहे.
फेसबुक मेसेंजरमध्ये दोन वाढीव नवे फिचर्स
युजर्सकडून फेसबुकच्या या नव्या फिचर्सला मोठी पसंती मिळत आहे. फेसबुक आपल्या मेसेंजर फिचर्सच्या माध्यमातून लवकरच मेंशन्स आणि रिअॅक्शन हे दोन नव्या फिचर्सचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. फेसबुकच्या या नव्या मेंशन्स फिचर्सच्या मदतीने ग्रुप चॅटमधून @ चा वापर करुन संबंधित व्यक्तीला डायरेक्ट नोटिफिकेशन पाठवू शकता येतील.
