पोर्शची नवी शानदार कार दाखल


जयपूर : भारतात आपली नवी ‘पॅनामेरा’ जर्मनीची स्पोर्टस कार कंपनी पोर्शने सादर केली आहे. पोर्शने भारतीय बाजारात ‘पॅनामेरा टर्बो’ आणि ‘पॅनामेरा टर्बो एक्झीक्युटिव्ह’ असे दोन मॉडल्स सादर केले आहेत.

१५० मिलीमीटर लांब एवढे याचे ‘व्हिलबेस’ आहे. त्याचबरोबर या कारमध्ये कमी वजनाचे ट्विन टर्बो चार्ज्ड ४.० लीटरचे व्ही८ पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याची पॉवर ५५० पीएस आणि टॉर्क ७७० एनएम आहे. गाडीचे इंजिन नव्या ८-स्पीड पीडीके ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही ऑल व्हिल ड्राईव्ह कार आहे. केवळ ३.८ सेकंदात ही १०० किलोमीटर प्रती तास वेग ही गाडी घेते.

यामध्ये स्पोर्ट क्रोनो पॅकेजचाही ऑप्शन उपलब्ध आहे. यात ती ० ते १०० चा स्पीड ३.६ सेकंदात पकडू शकते. या गाडीचा अधिकाधिक वेग ३०६ किलोमीटर प्रती तास ठेवण्यात आला आहे. या गाडीची किंमत १.९३ करोड रुपये आहे. या गाडीतही पॅनामेरा टर्बोचेच इंजिन देण्यात आले आहे. सध्या बाजारात असलेल्या जुन्या पॅनामेरा सारखेच याचे डिझाईन करण्यात आले आहे. या गाडीची किंमत २.०५ करोड रुपये निर्धारित करण्यात आली आहे.

Leave a Comment