… तरच जिओ तुम्हाला देईल १२० जीबी डेटा फ्री


मुंबई : येत्या ३१ मार्चला जिओची फ्री डेटा सेवा संपणार आहे. त्यासोबतच जिओ यूझर्सला प्राईम मेंबरशिप घेण्यासाठीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. जिओची मोफत सेवा ३१ मार्चनंतर विकतची होणार आहे.

प्राईममेंबरशिपनंतर रिलायन्स जिओने एकावर एक फ्री ऑफरची घोषणा केली होती. या ऑफरमध्ये कंपनी ३०३ रुपयांच्या प्लान घेणाऱ्यांना ५ जीबी ४ जी डेटा आणि ४९९रुपयांचा प्लान घेणाऱ्यांना १०जीबी ४जी डेटा फ्री देणार असल्याच्या घोषणा केल्या होता. हा प्लान यापूर्वी एका महिन्यासाठी वैध होता. मात्र आता आणखी एक नवा प्लान आला आहे. यात तुम्ही १ वर्षापर्यंत या मंथली फ्री डेटाचा लाभ घेऊ शकता.

युझरला ६० जीबी डेटा आणि १२० जीबी डेटा फ्री मिळवण्यासाठी १२ महिन्यांचे रिचार्ज एकत्र करावे लागेल. जर तुम्ही ३०३ रुपयांच्या प्लान घेत आहात तर १२ महिन्यांसाठी तुम्हाला एकत्रितरित्या ३६३६ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. यात तुम्हाला २८ जीबी/महिना डेटासह ५ जीबी अधिक डेटा फ्री मिळेल. म्हणजेच १२ महिन्यात तुम्हाला ६० जीबी डेटा फ्री मिळेल. याचप्रमाणे ४९९ रुपयांचा प्लान घेणाऱ्या यूझर्सनी एकत्रित १२ महिन्यांचे ५९८८ रुपयांचे रिचार्ज केल्यास यूझर्सला १२० जीबी डेटा फ्री मिळेल. हा डेटा दर महिन्याला १० जीबीच्या रुपात मिळेल.