जिओला मात देण्यासाठी व्होडाफोनचा नवा प्लॅन


मुंबई : व्होडाफोनने जिओला टक्कर देण्यासाठी जबरदस्त प्लॅन लॉन्च केला असून व्होडाफोन प्रत्येक महिन्याला ३४६ रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज १ जीबी या प्रमाणे महिन्याला २८ जीबी ३जी/४जी डेटा देणार आहे. मात्र, हा प्लॅन व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठी आहे.

जिओचा प्लॅन हा त्यांच्या प्राईम ग्राहकांसाठीच असेल, तर व्होडाफोनने अशी कोणतीही अट ठेवली नाही. व्होडाफोनच्या सर्व प्रीपेड ग्राहकांसाठी या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना प्रत्येक महिन्याला ३४६ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. यामध्ये दररोज १ जीबी ३जी आणि ४जी डेटा या प्रमाणे २८ जीबी ४जी डेटा मिळणार आहे. त्याचसोबत अनलिमिटेड फ्री कॉल करता येणार आहेत. व्होडाफोनच्या नव्या प्रीपेड ग्राहकांसाठीच्या प्लॅनला कसा प्रतिसाद मिळतो आणि जिओला टक्कर देण्यात व्होडाफोनला यश मिळतंय का, हे येत्या काळात दिसून येईल.

Leave a Comment