चक्क ११ वर्षांचा मुलगा देत आहे १२ वीची परीक्षा


हैदराबाद – एका ११ वर्षांच्या मुलाने मानवी मेंदूच्या जोरावर असाध्य गोष्ट साध्य करून दाखवली असून हैदराबादेतील ११ वर्षांचा मुलगा चक्क १२वीच्या परीक्षेला बसला आहे. त्याने अवघ्या ११व्या वर्षी १२वीची परीक्षा दिल्याने सर्वस्तरातून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.

या मुलाचे नाव अगस्त्य जयस्वाल असं असून, तो युसूफगुडामधील सेंट मेरी ज्युनिअर शाळेत शिक्षणाचे धडे गिरवतो आहे. हैदराबादेतीलच जुबली हिल्स येथील चैतन्य ज्युनिअर कॉलेजमधून होत असलेल्या परीक्षेत त्याने सहभाग घेतला आहे. माध्यमिक विद्यार्थी असल्यामुळे नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र आणि वाणिज्य हे त्याचे विषय आहेत.

अगस्त्य याचा छोटा भाऊ नैना जयस्वाल हा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू आहे. अगस्त्यचा भाऊ नैना हा सर्वात कमी वयाचा टेबल टेनिस खेळाडू असून, त्याने पीएचडीसाठी अर्ज केला आहे. तसेच अगस्त्यच्या आईनेही वयाच्या १५व्या वर्षीच उस्मानिया विश्वविद्यालयातून राज्यशास्त्रातून मास्टर्स पूर्ण केले होते. अगस्त्य म्हणाला, मी पाठांतर करत नाही, मात्र उत्तर समजून घेतो आणि मगच लिहितो. मला आयएएस ऑफिसर व्हायचे आहे. मी वयाच्या आठव्या वर्षीच १०वीची परीक्षा उत्तीर्ण झालो. अगस्त्याच्या या धाडसामुळे त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत.

Leave a Comment