जिओच्या पोस्टपेड ग्राहकांना भरावे लागणार दुप्पट बिल !


मुंबई: अल्पावधीत १० कोटी ग्राहक बनवून रिलायन्सच्या जिओने एकच खळबळ उडवून दिली आहे. मात्र जिओने हे ग्राहक करताना घोडचूक चूक केल्यामुळे त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांना दुप्पट बिल भरावे लागणार आहे. ५ सप्टेंबर २०१६ला जिओने धुमधडाक्यात प्रिपेड आणि पोस्टपेड सेवा सुरू केली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने फ्री कॉल आणि डाटा अशी वेलकम ऑफर दिली. ३१ डिसेंबर नंतर जिओने ग्राहकांना न्यू इयर ऑफर दिली. त्यामुळे ग्राहकांच्या संख्येत आणखी वाढ झाली.

जिओशी जे पोस्टपेड ग्राहक जुळले आहेत त्यांना त्यांचा प्लान मिळाला आहे. पण यातील अधिकाधिक पोस्टपेड ग्राहकांना याची माहितीच नाही की त्यांचा तो प्लान किती रुपयांचा आहे. दरम्यान आता प्राईम मेंबरशीप नंतर त्यांच्या या प्लानला देखील बदलण्यात आले आहे. ज्या ग्राहकांचा १४९ रुपयांचा प्लान होता, त्या सर्व ग्राहकांना आता प्राईम मेंबरशीप घ्यावी लागणार आहे. प्राईम मेंबरशीप प्लान हा ३०३ रुपयांमध्ये असल्यामुळे त्यांचा आधीचा प्लान हा ३०३ रुपयांमध्ये बदलणार आहे. तसेच पोस्टपेड ग्राहकांसाठी आता ३०३ रुपये, ४९९ रुपये आणि ९९९ असे प्लान देण्यात आले आहे. आता अचानक १४९ रुपयांचा प्लान ३०३ मध्ये बदलणार असल्याने जिओ ग्राहकांना आता ३०३ रुपये महिन्याला भरावे लागणार आहे. जी रक्कम आधीपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे जिओच्या पोस्टपेड ग्राहकांना आता मोठा फटका बसणार आहे.

Leave a Comment