रिलायन्स जिओचे नवे प्लॅन्स जाहीर


मुंबई: मोफत कॉलिंग आणि डेटा प्रदान करून मोबाईल सेवा क्षेत्रामध्ये खळबळ उडविणाऱ्या रिलायन्स जिओची ‘हॅपी न्यू इयर’ ऑफर ३१ मार्च रोजी संपुष्ठात येत असून त्यानंतरच्या काळात जिओच्या ग्राहकांना ते दरपत्रक लागू होणार आहे. त्यासाठीचे प्लॅन कंपनीने जाहीर केले असून १९ रुपयांपासून ९ हजार ९९९ रुपयांपर्यंत हे प्लॅन्स असणार आहेत.

‘हॅपी न्यू इयर’ ऑफर अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळविण्यासाठी ग्राहकांना ९९ रुपये भरून प्राईम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. तसेच ४ जी डेटा आणि जिओ मीडिया सर्विसेस मिळविण्यासाठी दरमहा ३०३ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. कॉलिंग सुविधा जिओवर मोफतच राहील; असे कंपनीने जाहीर केले आहे.

जिओचे नवे दर असे असतील-

१९ रुपये प्लॅन:
मोफत कॉलिंग, एसएमएस आणि जिओ ऍप्स सुविधा. प्राईम मेंबर्ससाठी २०० एमबी; तर नॉन प्राईम मेंबर्ससाठी १०० एमबी ४ जी डेटा. व्हॅलिडिटी १ दिवस
४९ रुपये प्लॅन:
प्राईम मेंबर्ससाठी ६०० एमबी; तर नॉन प्राईम मेंबर्ससाठी ३०० एमबी ४ जी डेटा. व्हॅलिडिटी ३ दिवस
९६ रुपये प्लॅन:
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा, ७ जीबी ४ जी डेटा, प्रतिदिन १ जीबी डेटा, नॉन प्राईम मेंबर्ससाठी याच सर्व सुविधा केवळ प्रतिदिन ०.६ जीबीची मर्यादा व्हॅलिडिटी ७ दिवस
१४९ रुपये प्लॅन:
प्राईम मेंबर्ससाठी २ जीबी ४ जी डेटा १०० एसएमएस. नॉन प्राईम मेंबर्ससाठी १ जीबी डेटा. व्हॅलिडिटी २८ दिवस
३०३ रुपये प्लॅन:
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा. २८ जीबी ४ जी. प्रतिदिन १ जीबी. नॉन प्राईम मेंबर्ससाठी २.५ जीबी डेटा. प्रतिदिन मर्यादा नाही. व्हॅलिडिटी २८ दिवस
४९९ रुपये प्लॅन:
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा. ५६ जीबी ४ जी. प्रतिदिन २ जीबी. नॉन प्राईम मेंबर्ससाठी ५ जीबी डेटा. व्हॅलिडिटी २८ दिवस
९९९ रुपये प्लॅन
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा. ६० जीबी ४ जी. व्हॅलिडिटी ६० दिवस नॉन प्राईम मेंबर्ससाठी १२.५ जीबी डेटा. व्हॅलिडिटी ३० दिवस
१९९९ रुपये प्लॅन
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा.१२५ जीबी ४ जी. व्हॅलिडिटी ९० दिवस. नॉन प्राईम मेंबर्ससाठी ३० जीबी डेटा. व्हॅलिडिटी ३० दिवस
४९९९ रुपये प्लॅन
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा. ३५० जीबी ४ जी. व्हॅलिडिटी १८० दिवस . नॉन प्राईम मेंबर्ससाठी १०० जीबी डेटा. व्हॅलिडिटी ३० दिवस
९९९९ रुपये प्लॅन
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा. ७५० जीबी ४ जी. व्हॅलिडिटी ३६० दिवस . नॉन प्राईम मेंबर्ससाठी २२० जीबी डेटा. व्हॅलिडिटी ३० दिवस
पोस्ट पेड प्लॅन्स
३०३ रुपये प्लॅन
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा. २८ जीबी ४ जी. प्रतिदिन १ जीबी मर्यादा. नॉन प्राईम मेंबर्ससाठी २.५ जीबी डेटा.
४९९ रुपये प्लॅन
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा. ५६ जीबी ४ जी. प्रतिदिन २ जीबी मर्यादा. नॉन प्राईम मेंबर्ससाठी ५ जीबी डेटा.
९९९ रुपये प्लॅन
प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा. ६० जीबी ४ जी. नॉन प्राईम मेंबर्ससाठी १२.५ जीबी डेटा.

Leave a Comment