जिओ आज लाँच करु शकते दोन नवे फीचर फोन !


नवी दिल्ली : आज आणखी एक धमाका रिलायन्स जिओ करणार असून मीडिया रिपोर्टनुसार आज दोन नवे फीचर फोन जिओ कंपनी लाँच करु शकते. हे दोन्ही फोन ४जी असणार आहेत. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरुनही यूजर्स या नव्या मोबाईल्सना खरेदी करु शकतात. दरम्यान, कंपनीकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

४जी सपोर्ट फोन ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी जिओचे हे फोन चांगले पर्याय ठरु शकतात. हे दोन्ही फोन कीपॅडवाले असणार आहेत. ९९९ रुपयांच्या या फोनमध्ये २ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असणार आहेत. तसेच सेल्फीसाठी व्हिजीए कॅमेरा देण्यात आला आहे. यात १८०० mAH बॅटरी असणार आहे. कंपनी ९९९ रुपयांच्या फोनव्यतिरिक्त १४९९ रुपयांचा नवा फोनही लाँच कऱणार आहे. यात ५ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असेल तसेच २३००mAH बॅटरी असेल.

Leave a Comment