फक्त ९९ भाग्यवंताना मिळणार मर्सिडीजची मेबॅक जी ६५०


मर्सिडीजने त्यांची आणखी एक लग्झरी कार पेश केली आहे. मर्सिडीज म्हणजे लक्झरी, स्टाईल व कंफर्ट हे समीकरण ग्राहकांच्या मनात पक्के ठसले आहे. त्यामुळेच मर्सिडीजची कार म्हटली की ती लग्झरी कार असणार यात शंका नकोच. पण मर्सिडीजची ही नवी मेबॅक जी ६५० दिसायलाही अनोखी आहे. ती म्हटले तर ऑफ रोडर आहे कांहीशी लिमोसिनसारखीही आहे व थोडी थोडी एसयूव्हीसारखीही आहे. या कारची किंमत अजून जाहीर झालेली नाही मात्र ग्राहकांना किमतीचा प्रॉब्लेम नसला तरी आणखी एक प्रॉब्लेम येऊ शकतो तो म्हणजे ही कार फक्त ९९ धनाढ्यच विकत घेऊ शकतील. कारण स्पष्ट आहे, ते म्हणजे कंपनी या मॉडेलच्या फकत ९९ कार्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.

या कारच्या इंटिरियरवर कंपनीने खूपच मेहनत घेतली आहे. गाडीत बसण्यासाठी प्रशस्त जागा आहे. सीट बसायला अत्यंत आरामदायक आहेतच पण कारचा ग्राऊंड क्लिअरन्सही दोन फुटांचा आहे. पुढच्या सीटवर बसणार्‍यांना कन्व्हेन्शनल रूफ तर मागे बसणार्‍यांना फोल्डींग रूम मिळते. ती आपोआप उघडते. रियरमधील सीट एअरचेंबर सारख्या आहेत व तेथे मसाज रूमही करता येते. प्रत्येक प्रवाशाच्या मागे १० इंची हाय रेझोल्युशन स्क्रीन आहे. कारला व्ही १२ टर्बो इंजिन दिले गेले आहेत. कारची ९९ युनिट याच वर्षात विकली जाणार आहेत.

Leave a Comment