इस्त्रोच्या मोहिमेचा सेल्फी व्हिडिओ व्हायरल


श्रीहरीकोटा – बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवा इतिहास रचला होता. हे उपग्रह अवकाशात इस्रोने विकसित केलेल्या पीएसएलव्ही सी-३७ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने यशस्वीरित्या सोडण्यात आले. यासोबतच भारताने रशियाचा विक्रम मोडित काढला. हे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कसे सोडण्यात आले, त्याचा एक व्हिडिओ ‘इस्रो’ने शेअर केला आहे.

इस्रोकडून पीएसएलव्ही सी-३७ च्या लाँचिंगचा हा सेल्फी व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर सेल्फीप्रेमींकडून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत आहे. अवकाशात पोहचल्यानंतर एक-एक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कसा सोडण्यात येतो, ते ‘इस्त्रो’च्या कॅमे-यांनी टिपलं आहे. उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची ही संपूर्ण प्रक्रिया पाहण्याची संधी ‘इस्रो’ने या व्हिडिओद्वारे उपलब्ध करुन दिली आहे.

एकाचवेळी तब्बल १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने इस्रो ही जगातील सर्वात यशस्वी अंतराळ संस्था ठरली आहे. PSLV या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

Leave a Comment