बगळ्याने फक्त ३० सेकंदांत फस्त केले मगरीचे पिलू


फ्लोरिडा – सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. चक्क ३० सेकंदांत मगरीच्या पिल्लाला एका बगळ्याने गिळंकृत केले आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बगळा मगरीच्या पिलाला खाताना दिसत आहे.

बगळा जंगलात शिकारच्या शोधात पाण्यात उभा असतानाच अचानक त्याची नजर मगरीच्या पिलावर पडते आणि तो त्याच्यावर हल्ला करतो. त्यानंतर तो त्या मगरीच्या छोट्या पिलाला अवघ्या काही सेकंदांत भक्ष्य करतो. जवळपास १ फूट लांब असलेल्या मगरीच्या पिलाला खाण्यासाठी बगळ्याला फक्त काही सेकंदांचा अवधी लागल्याचे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.

Leave a Comment