ट्रम्प यांची धोरणे भारतासाठी हितकारक – मुकेश अंबानी


मुंबई – जगातील अनेक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्योगविषयक धोरणांमुळे देश चिंतित असून आयटी उद्योगात काम करणा-या अनेक भारतीयांना आपल्या भवितव्याची चिंता सतावत आहे. पण याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे मात्र बिलकुल याउलट मत आहे. ट्रम्प यांच्या धोरणांकडे ते एक संधी म्हणून पाहत आहेत.

भारताला जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर बाजारपेठ आपण बनवू शकतो. त्यासाठीचे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध असून भारतीय प्रतिभेला आणि आयटी उद्योगाला भारतातील समस्या सोडवण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यास ट्रम्प यांच्या उपायांमुळे मदत होईल. देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी आहे. यामुळे लोकांचे जीवनमान उंचावण्याची एक संधी मिळेल तसेच इंडस्ट्रीची उत्पादकता वाढवण्यावरही लक्ष दिले पाहिजे असे मुकेश अंबानी म्हणाले.

मुंबईत नॅसकॉम इंडियाच्या लीडरशीप फोरमच्या झालेल्या कार्यक्रमात अंबानी बोलत होते. कोणत्याही एका कंपनीला डिजीटल इको सिस्टीम उभारणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कंपन्यांना पुढच्या जनरेशनचे तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट धोरण अवलंबताना एच १ बी व्हिसावर मर्यादा आणली आहे. याचा फटका आयटी उद्योगात काम करणा-या भारतीयांना बसत आहे.

Leave a Comment