अजय त्यागी सेबीचे नवे प्रमुख


वरीष्ठ आयएएस अधिकारी अजय त्यागी यांची सेबीचे नवे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली असून १ मार्चला ते सध्याचे प्रमुख यू.के सिन्हा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. या पदासाठी अनेकांची नांवे चर्चेत होती व या पदाच्या निवडीसाठी सर्च कमिटी नियुक्त करण्यात आली होती. या कमिटीने आठ नांवे सुचविली होती त्यातील दोन नांवे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती.

या दोन मध्ये अजय त्यागी व उर्जा मंत्रालयाचे सचिव पी.के पुजारी यांची नांवे होती. त्यात अजय त्यागी यांची निवड झाली. त्यागी यांच्या नावाची याआधीही चर्चा होती. ते पाच वर्षे या पदावर काम करणार आहेत. सध्याचे प्रमुख यू.के सिन्हा यांची २०११ मध्ये या पदावर तीन वर्षांसाठी निवड केली गेली होती पण त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

Leave a Comment