अंडी चोरल्यामुळे शोकग्रस्त बदकांचा अन्नत्याग

चीनमध्ये एका पर्यटनस्थळी अंडी चोरीस गेलेल्या बदकांच्या जोडीने अन्नत्याग केल्याची घटना घडली आहे. या बदकांनी सतत चार दिवस काही खाल्ले तर नाहीच, परंतु सतत कलकलाट करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. आता पोलिस त्यांच्या चोरीस गेलेल्या अंड्यांचा तपास करत आहेत.

पूर्व चीनमधील शांडोंग प्रांतातील माऊंट ताई येथे ही घटना घडली आहे. येथे हा हंसाचा जोडा विणीच्या हंगामासाठी आला होता. येथील सुरक्षा रक्षकांनी सीसीटीव्ही कॅमेराचे चित्रण तपासले असून दोन पर्यटकांनी ही चोरली असावीत, असा अंदाज व्यक्त केला आहे.

या हंसांची पाच अंडी 1 फेब्रुवारी रोजी नाहीशी झाली. त्यानंतर या हंसांनी घरटे सोडले, सतत कलकलाट केला आणि जवळ जाणाऱ्या लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे हंसपालन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक ली यामिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

न उबवलेली हंसांची अंडा लोकांसाठी निरुपयोगी असतात. ती अंडी खाताही येत नाहीत आणि उबवताही येत नाहीत. आता ती परत दिली, तरी ती उबवता येणार नाही, असे या पर्यटनस्थळाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment