सौदीच्या युवराजाने घडवली ८० ससाण्यांना हवाई सफर


सौदीमधील युवराजांकडे अमाप पैसे असतात की ते त्या पैशाने आपली कोणतीही हौस पूर्ण करू शकतात. येथील युवराज हौस म्हणून येथे वाघ, सिंह पाळायचे. पण सौदी सरकारने आता यावर बंदी घातली आहे. सौदीच्या युवराजांना वाघ, सिंह यांसारखे प्राणी पाळण्याबरोबरच बहिरी ससाणा पाळण्याचे वेड आहे. त्यामुळे अनेक युवराजांच्या पाठीवर बहिरी ससाणा दिसेल. आपल्याला कदाचीत आश्चर्य वाटेल पण या ससाण्यांचे देखील पासपोर्ट असल्यामुळे युवराजांना या ससाण्यांना घेऊन बाहेरच्या देशात जायचे असेल तर हा पासपोर्ट सोबत बाळगणे आवश्यक आहे. काही सौदी राजकुमार तर विमानाची महागडी तिकिट काढून या पक्ष्यांना आपल्या सोबत नेतात.

सध्या सोशल मीडियावर तब्बल ८० बहिरी ससाण्यांचा विमान प्रवासाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हे सारे ससाणे सौदीच्या युवराजाच्या मालकीचे असल्याचे समजते दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे या ससाण्यांसोबत इतर सहप्रवासी देखील प्रवास करत आहेत. फ्लाय दुबईच्या विमानातील हे दृश्य असून युवराजांनी आपल्या ८० ससाण्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी विमानातील ८० जागा आरक्षित केल्या होत्या. कदाचित आपल्यासारख्यांना हे दृश्य फार विचित्र वाटू शकेल. पण दुबईतल्या अनेक विमानांमध्ये ससाणे दिसणे ही सामान्य गोष्ट आहे. दुबईत अनेक युवराज आणि श्रीमंत माणसं आपल्या सोबत ससाणा बाळतात. ससाण्याचे खेळही येथे खूप प्रसिद्ध आहेत. या ससाण्याचे पासपोर्ट देखील आहेत. त्यामुळे या पक्ष्याचा मालक ससाण्याला घेऊन बहिरीन, कुवेत, पाकिस्तान, कतार, मोरोक्को, सिरिया यासांरख्या देशात प्रवास करू शकतात.

Leave a Comment