
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी हुराकान आरडब्ल्यूडी स्पायडर इतावलीची लक्झरी स्पोर्टस् कार निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनी लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असून रिअर व्हिल ड्राइव्हवर काम करणारी ही कार येत्या १ फेब्रुवारीला लाँच करण्याची शक्यता आहे.
लवकरच येणार लॅम्बोर्गिनी हुराकान आरडब्ल्यूडी
या कारमध्ये ५.२ लिटर व्ही१० इंजिन देण्यात आले असून ५८० बीएचपीची पॉवर आणि ५४० एनएमचा टार्क जनरेट करता येऊ शकतो. त्याचबरोबर ७ स्पीड डय़ुअल क्लच गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या गाडीचा टॉप स्पीड ३१९ किमी/प्रतितास इतका आहे.
