देशातील राजकीय नेत्यांकडे आहेत या शानदार कार !


आपल्याला सिनेसृष्टीशी निगडीत गोष्टी जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. त्यांचे राहणीमान, त्यांची वागणूक आणि त्यांच्या अफेअरबद्दल देखील आपल्याला जाणून घ्यायचे असते. बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच देशातील मोठ्या राजकीय नेत्यांबद्दलही असे जाणून घेण्याची इच्छा अनेकांमध्ये असते. त्यामुळे आपल्या देशातील काही मोठे कोणत्या कार वापरतात याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीएमडब्ल्यू ७६०li हाय सिक्युरिटी एडिशन कार वापरतात. ही कार सुपरपॉवर कॅटेगरीतील कार आहे. जी हॅंडगन, रायफलसोबत एके ४७चे वारही झेलू शकते. त्याचबरोबर बॉम्बनेही या कारचे काहीही होऊ शकत नाही. या कारमध्ये बॅकअप ऑक्सिजन टॅंक लावण्यात आला आहे. या कारची किंमत २ कोटी रूपये आहे.

अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे पोर्शे ही शानदार कार असून या कारची किंमत १.०२ कोटी रूपये इतकी आहे. ही कार या कंपनीची सर्वात लोकप्रिय कार आहे.

मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएल ३५० सीडीआय ही कार आहे. १०० लीटरचे इंधन क्षमता असलेली ही व्ही/६ ७जी-ट्रॉनिक प्लस इंजिनने पॉवर्ड आहे.

सिने अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या मर्सिडीज एस क्लास एस ३५० ही कार आहे. या कारची किंमत १.१८ कोटी ऐवढी आहे. सुरक्षेसाठी या कारमध्ये ८ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे टोयोटा लॅंडक्रुझर आहे. या कारची किंमत साधारण १.२९ कोटी रूपये ऐवढी आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता टोयोटा इनोव्हा ही कार घेतली आहे. ते आधी वॅगनआर ही कार वापरत होते. इनोव्हाची किंमत साधारण १६ ते १९ लाख रूपये ऐवढी आहे.

Leave a Comment