आजपासून अॅमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन सेल’


पुन्हा एकदा अॅमेझॉन इंडिया ग्रेट इंडियन सेल घेऊन येत असून २० जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान हा सेल असणार आहे. तुम्हाला या दिवसांत खूप चांगली ऑफर मिळणार असून तुम्ही खूप चांगली डिल करू शकता.

ग्राहकांना मोटो जी४ प्लस (१६जीबी) या स्मार्टफोनवर २ हजाराचा फ्लॅट डिस्काऊंट मिळणार आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉन सेलवर ११,४९९ रुपयांत उपलब्ध आहे. तर बाजारात हाच फोन १३,४९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने पेमेंट करणार असाल तर तुम्हाला अॅडिशनल कॅशबॅक ऑफर देखील मिळेल, मोबाइल अॅपचा वापर करणाऱ्या लोकांना १५% तर डेकस्टॉपवर १०% कॅशबॅक मिळणार आहे.

ग्राहकांना या धमाकेदार सेलमध्ये अनेक वस्तूंवर मोठी ऑफर दिली जाणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक, होम, किचन, फॅशन आणि इतरही अनेक प्रॉडक्ट्सवर सूट दिली जाणार आहे. विविध वस्तूंवर सूट देण्यासोबत अनेक ऑफर्सही देत आहे. या सेलसाठी अ‍ॅमेझॉन इंडियाने स्टेट बॅंक ऑफ इंडियासोबत भागीदारी केली आहे. अशात जर ग्राहकांनी एसबीआय कार्डने पेमेंट करतील, तर त्यांना त्याअर १५ टक्के डिस्काऊंट आणि वेबसाईटवर १० टक्के डिस्काऊंट दिल जाणार आहे. यासोबतच जर कोणता ग्राहक अ‍ॅमेझॉन पे सर्व्हिस द्वारे पेमेंट करतात तर त्यांना १५ टक्के कॅशबॅक दिले जाणार आहे.

जास्तीत जास्त ग्राहक या सेलचा फायदा घेतील अशी आशा अ‍ॅमेझॉन इंडियाला आहे. कंपनीने या सेलच्या निमित्ताने डिलिव्हरीसाठी नवीन नोकरभरती केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, सेलसाठी त्यांनी ७ हजार ५०० लोकांना नोकरी दिली आहे.

Leave a Comment