मोदी बनले सोशल मीडियाचे बॉस


नवी दिल्ली – अमेरिकाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊस सोडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स् असणारे राजकीय नेता बनले आहेत. पीएमओच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आणि गूगल प्लस या सोशल मीडियावर असलेल्या राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत.

मोदी यांच्या टि0टर, फेसबुक, गुगल प्लस, लिंयडइन, इनस्टाग्राम, यूट्यूबवर क्रमश: 2.65 कोटी, 3.92 कोटी, 32 लाख, 19 लाख, 58 लाख, 59 लाख फॉलोअर्स आहेत. राजकीय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी यांची अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय आहे. हे अ‍ॅप सुमारे एक करोड जणांनी डाऊनलोड केले आहे.

ट्विटरवर नरेंद्र मोदी 1,641 जणांना फॉलो करतात. यामध्ये भारताचे राष्ट्रपती, सर्व देशांचे राष्ट्राध्यक्ष, भारताचे सर्व प्रमुख दुतावास, सरकारी विभाग, राज्यांचे मुख्यमंत्री, खेळाडू, अभिनेता आणि प्रसिद्ध लेखकांना ते फॉलो करतात. मोदी जगभरातील प्रमुख पत्रकारांनाही फॉलो करतात.

Leave a Comment