व्हायरल होत आहे तीन पायांची सुंदर तरुणी


नवी दिल्ली – रोज काही ना काही नवे सोशल मीडियावर घडत असते. सोशल मीडियावर मंगळवारपासून तीन पायांच्या एका सुंदर तरुणीचा फोटो व्हायरल झाला असून लाखो लोकांनी दोन दिवसांत हा फोटो पाहिला आहे.

हा फोटो पहिल्यांदा इंगर नामक एका सोशल मीडिया वेबसाईटवर अपलोड करण्यात आला. सुरुवातीला पाहिल्यास त्या तरुणीला तीन पाय असल्याचे दिसतात मात्र असे शक्य आहे का ? चला तर ठिक आहे, तुमची उत्सुकता ताणून न धरता आम्हीच तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो. तुम्ही हा फोटो नीट लक्षपूर्वक पाहिल्यास मुलीने हातात एक फ्लॉवरपॉट पकडल्याचे दिसू शकते. योगायोगाने हा फोटो असा क्लिक झाला की या तरुणीला तीन पाय असल्यासारखे यात दिसू लागले. ते काही का असेना, या फोटोमुळे सोशल मीडियावर चायवाला, तरकारीवाली यांच्यानंतर ही ‘तीनपायवाली’ भलतीच लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Comment