व्होडाफोन देणार १६ रुपयात अनलिमिटेड ४जी डेटा


नवी दिल्ली : इतर टेलिकॉम कंपन्यांची रिलायन्स जिओच्या मोफत व्हॉईस कॉलिंग आणि डेटा ऑफरनंतर ऑफर देण्यासाठी चढाओढ सुरु असून आता व्होडाफोनने त्यातच पुन्हा एक ऑफर आणली आहे.

या नव्या ऑफरनुसार युझर्सना व्होडाफोन एक तासासाठी १६ रुपयात अनलिमिटेड ३जी, ४जी डेटा मिळणार आहे. या नव्या ऑफरचे नाव ‘सुपरआवर’ असे आहे. ही ऑफर देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. २जी वापणाऱ्या ग्राहकांना ५ रुपये प्रतितास या दराने अनलिमिटेड डेटा वापरता येईल. तर ७ रुपये प्रतितास या दराने अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची देखील ऑफर आणली आहे, अशी माहिती व्होडाफोनने जारी केलेल्या एका पत्रकात दिली आहे. दरम्यान या आठवड्यातील व्होडाफोनची ही दुसरी ऑफर असून काही दिवसांपूर्वीच व्होडाफोनने २जी मधून ४ जीमध्ये सिम अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड डेटा ऑफर आणली होती.

Leave a Comment