ई-वॉलेटच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह; तुमचे पैसे किती सुरक्षीत!


एका मिनिटात फटाफट पैसे ट्रान्सफर, ना रांगेत उभी राहण्याची गरज, ना वेळीची काळजी. आज कोणत्याही वेळेत आणि कोठेही असताना पैसांची देवाण-घेवाण करण्यासाठी ई-वॉलेट हा सगळ्यात सोपा आणि सरळ उपाय म्हणून पुढे आला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडूनही अनेक सवलतींची घोषणा करण्यात आली. मात्र मोबाईल किंवा डाटा
चोरी/हरविल्यास खात्यातील पैसे परस्पर ट्रान्सफर होण्याचा धोका आहे. पेटीएमसारख्या कंपन्याही यापासून सुरक्षित नाही. एसबीआयनेही ग्राहकांच्या
माहितीच्या सुरक्षिततेचे कारण देत ई-वॉलेटच्या पेमेंट ट्रान्सफरचवर बंदी घातली आहेत. आताच कुठे आपण कॅशलेसच्या दिशेने वाटचाल करत असताना ई-वॉलेटच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित राहत आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदी सरकारने कॅशलेस आणि डिजीटल इंडिया मोहिमेचा सर्वात जास्त फटका एसबीआय बँकेला बसत आहे. एसबीआय बँकेने
ग्राहकांच्या व्यवहारांची सुरक्षितता म्हणून ई-वॉलेटमध्ये पेमेंट ट्रान्सफर करण्यावर निर्बंध लादले आहेत. परंतु ही बंदी फक्त नेटबँकिंगद्वारा होणार्‍या व्यवहारांवर असणार आहे. म्हणजे आता तुम्ही एसबीआय बँकेमधून पेटीएम, मोबीक्विक, फ्रीचार्ज, जियो मनी, एअरटेल मनी यासारख्या ई-वॉलेटमध्ये आपल्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही. परंतु एसबीआयच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही आपले ई-वॉलेट रिचार्ज करू शकता.

दरम्यान, पेटीएम कंपनीला अनेक ग्राहकांनी गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. पेटीएमच्या 48 ग्राहकांनी अफरातफर करत 6.15 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा सीबीआय तपास करीत आहे. पेटीएमचे सुमारे 15 कोटींपेक्षा अधिक एयिटव्ह ग्राहक आहेत. असा करावा ई-वॉलेटचा सुरक्षित व्यवहार संभाव्य धोका लक्षात घेता ई-वॉलेटचा सुरक्षित व्यवहार करणे ग्राहकांच्या हिताचे ठरते. यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

1) मोबाईलवर होम लॉक असावे किंवा फिंगर लॉक असल्यास उत्तम.
2) अ‍ॅप लॉकमुळे ई-वॉलेटही आपोआप लॉक होईल.
3) प्रत्येकवेळी प्ले स्टोरमधूनच अ‍ॅप डाऊनलोड करावे.
4) ई-वॉलेटला वाय-फायशी कनेयट करून कधीही पेमेंट करू नये. त्यामुळे तुमचा डाटा वाय-फाय सर्व्हरवर सेव्ह होण्याची शययता आहे.
5) मोबाईलमध्ये फक्त आवश्यक अ‍ॅपचा वापर करावा.
6) कोणतीही माहीती ई-मेलवर सेव्ह करू नये आणि आपल्या ई-वॉलेटसाठी पिन कोडचा वापर करावा.
7) ई-वॉलेटचा पासवर्ड गुप्त असावा आणि तो 10 अंकी असल्यास उत्तम. तसेच पासवर्ड सतत बदलत राहिल्यास तो जास्त सुरक्षित राहतो.
8) डिजिटल वॉलेटच्या सेफ्टीसाठी बेसिक एंटी वायरस डाऊनलोड करावा.
9) आपला मोबाईल कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडे देऊ नये.
10) फाईंड माय मोबाईल हा विकल्प ऑन ठेवावा. कारण मोबाईल चोरी केल्यास किंवा हरविल्यास त्याचे लोकेशन लगेच समजेल.
11) डेबीट किंवा क्रेडीट कार्डाची माहिती ई-वॉलेट अ‍ॅपवर सेव्ह करू नये.
12) ई-वॉलेटमध्ये आवश्यक तेवढाच बॅलेंस ठेवावा.

Leave a Comment