रिलायन्स जिओच्या युझर्ससाठी आणखी एक खुशखबर


आपल्या युझर्ससाठी आणखी एक मोठे गिफ्ट टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने दिले असून इंटरनॅशनल कॉलिंग आणि एसएमएस या दोन महत्वाच्या मेनूसाठी कंपनीने खास प्लान लाँच केले आहेत. हॅप्पी न्यू ईअर ऑफर नंतर कंपनीने हे दुसरे दोन प्लान लाँच केले आहेत. आयएसडी कॉम्बो पॅकमध्ये ५०१ रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला ४३५ रुपयाचे बॅलेन्स मिळेल.

तुम्हाला ५०१ रुपयाच्या रिचार्जमध्ये ४३५ रुपये वापरायला मिळतील. हा एक आयएसडी पॅक असून हा पॅक तुम्ही २८ दिवसांपर्यत वैध असणार आहे. या सोबतच एक युझर ११०१ रुपयाचे रिचार्ज करू शकतात. ज्यामध्ये त्या युझर्सला ९५७ रुपये वापरायला मिळणार आहे. हा देखील इंटरनॅशनल कॉलिंग पॅक आहे. हा प्लान देखील २७ दिवसांसाठी असू शकतो.

तसेच कंपनीने आणखी एक प्लान आणला आहे. ज्यामध्ये युझर्सला एसएमएस बॅलेंस देखील दिला जाईल. युझर्सला १०० हून अधिक एसएमएस पाठवायचे असतील तर त्यांना २०१ रुपयाचे रिचार्ज करावे लागेल. यामध्ये युझर्सला १७५ एसएमएस पाठवण्याचा बॅलेंस दिला जाईल. यामध्ये तुम्ही लोकल, नॅशनल मॅसेजवर ८५ पैसे आणि इंटरनॅशनल मॅसेजवर ५ रुपये कट केले जातील.

Leave a Comment