झेडटीईचा ब्लेड व्ही ८ प्रो स्मार्टफोन


लास वेगास येथे सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्राॅनिक शो मध्ये झेडटीईने त्यांचा नवा स्मार्टफोन सादर केला असून ब्लेड सिरीजमधला हा पहिला फोन आहे. ब्लेड व्ही ८ प्रो अशा नावाने हा फोन सादर केला गेला आहे. कंपनीचा हा फ्लॅगशीप स्मार्टफोन आहे.

या फोनसाठी ५.५ इंची कॉर्निंग गुरील्ला ग्लास थ्री प्रोटेक्शन दिले गेले आहे. फिंगर प्रिंट सेन्सरसह असलेल्या या फोनला ड्युल सिम व तरीही हायब्रिड सिम स्लॉटची सुविधा आहे. क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारी ३१४० एमएमएच ची बॅटरी, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, १३ एमपीचे दोन बॅक कॅमेरे एलईडी फ्लॅशसह दिले गेले आहेत. ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा फोनसाठी दिली गेली आहे.

Leave a Comment