
मुंबई : आता जास्त पैसे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत प्राणी पाहण्यासाठी मोजावे लागणार आहेत.
राणीच्या बागेत प्राणी पाहण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे
दहा पटीने राणीबागेतील प्रवेश शुल्क वाढवण्यात येत असून पेंग्विन पाहण्यासाठी प्रौढांना १०० रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी २००३मध्ये राणीबागेतील प्रवेश शुल्क वाढवण्यात आले होते. त्यानुसार सध्या प्रौढांना ५ रुपये तर १२ वर्षाखालील मुलांना २ रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामध्ये आता या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचे प्रशासनाने सुचवले आहे. २०१२सालापासून राणीबागेचा विकास पासून सुरु आहे.
काही महिन्यांपूर्वी राणीबागेत ८ हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यापैकी एकाचा सुमारे दोन महिन्यांपूर्वी संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे अन्य पेंग्विनना सध्या इंटेरपिटिशन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी असलेल्या काचेच्या पिंजऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दक्षिण कोरियातून हे पेंग्विन आणण्यात आले. ६ पेंग्विनवर दोन पेंग्विन हे भेट स्वरूपात देण्यात आले. ज्यासाठी महापालिकेने सुमारे अडीच कोटी रुपये अदा केले. तर पेंग्विनना राहण्यासाठी अनुकल असलेल्या काचेच्या पिंजऱ्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
