
तिरुपती – फेब्रुवारी-2017मध्ये एकाचवेळी 103 सॅटेलाईट लॉच करून इस्त्रो एक नवीन विश्वविक‘म रचणार आहे. पीएसएलव्ही-सी37 रॉकेटच्या माध्यमातून अमेरिका आणि जर्मनीसह अनेक देशांच्या 100 सॅटेलाईट एकाचवेळी लॉच करण्याचा इस्त्रोचा मानस आहे. याबाबत एस. सोमनाथन म्हणाले की, एकाचवेळी 100हून अधिक सॅटेलाईटचे उड्डाण करून आम्ही एक सेन्चूरी बनविणार आहे.
इस्त्रो १०३ सॅटेलाईट लॉच करून रचणार इतिहास
सोमनाथ म्हणाले, इस्त्रोने जानेवारी-2017च्या शेवटच्या आठवड्यात एकाचवेळी 83 सॅटेलाईटचे प्रेक्षपण करणार होता. ज्यामध्ये 80 सॅटेलाईट हे विदेशातील होते. मात्र, आणखी 20 विदेशी सॅटेलाईट जोडल्या गेल्याने हे प्रेक्षपण एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले. आता 103 सॅटेलाईटचे प्रेक्षपण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे.
