
मुंबई: आयफोन ६ वर ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टने एक्सचेंज ऑफरमध्ये तब्बल २२०००रु. ची सूट दिल्यामुळे हा फोन अवघ्या ९९९० रुपयात तुम्ही खरेदी करु शकता. तुम्ही आता ९९९० रुपयात आयफोन ६चा स्पेस ग्रे १६ जीबी मॉडेल खरेदी करु शकता. आजवरचे हे सर्वात मोठे डिस्काउंट असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या स्मार्टफोनवर ५ हजार रुपयापर्यंत फ्लॅट डिस्काउंटही देण्यात आले आहे.
अवघ्या ९९९० रुपयात फ्लिपकार्ट देणार आयफोन ६ !
जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला अॅक्सिस बँकेच्या साह्याने तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटशिवाय ५ टक्के आणखी सूट मिळणार आहे. जुना फोन बदलून तुम्ही सर्वाधिक २२००० पर्यंत सूट मिळवू शकतात. पण फोनच्या मॉडेलवर याचंचे डिस्काउंट निश्चित केले जाणार आहे. आयफोन ६ एस प्लस वर सर्वाधिक सूट आहे. २०१५ साली आयफोन ६ लाँच करण्यात आला होता. त्यानंतर अॅपलने गेल्याच वर्षीच आयफोन ७ आणि ७ प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते.
