वाहतुकीसाठी खुला झाला जगातील सर्वात उंच पूल


बेईपानजियांग : अत्यंत महत्वाकांक्षी देश म्हणून जगभरात चीन हा देश लोकप्रिय असून अशा वास्तू,शिल्प बांधण्याचे विक्रम चीन देशाच्या नावे आहेत. या लौकिकाला साजेशा गोष्टींमध्ये आता आणखी एक भर पडत आहे. चीनमधील युनाना-गीझू या दोन प्रांताना जोडणारा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

पूर्वी या दोन्ही ठिकाणी पोहचण्यासाठी चार तासांहूनही जास्त वेळ लागत असे, पण आता हे अंतर केवळ एक तासात पार करता येणे शक्‍य आहे. बेईपानजियांग नावाचा हा पूल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत उंच पूल आहे. चीनमध्ये अभियांत्रिकीचे आश्‍चर्यचकित करणारी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. प्रचंड धुक्‍यात हरवलेला, उंचीवर असलेला हा पूल वाहतुकीसाठी नागरिकांना खुला करण्यात आला. काचेच्या पुलानंतर आता चीनमधला सगळ्यात उंच असा हा पूल आहे. बेईपानजियांग या पुलावर बघता बघता वाहनांनी गर्दी केली होती.

जमिनीपासून एक हजार ८५४ फूट उंचीवर हा पूल आहे. या पुलाची लांबी एक हजार ३४१ मीटर असल्यामुळे जगातील सर्वात उंच पुलाच्या यादीत या पुलाचा सामावेश झाला आहे. चीनमध्ये जगातील पहिला उंच काचेचा पूल सप्टेंबरमध्ये पर्यटकांसाठी खुला केला होता. या काचेच्या पुलावर चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केल्यानंतर फक्त दोन दिवसांत सुरक्षेच्या कारणास्तव तो बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. आता हा पूल तरी किती दिवस खुला राहणार याविषयी अशी चर्चा रंगत आहे.

Leave a Comment