कसे डाऊनलोड आणि वापरणार भीम अ‍ॅप; जाणून घ्या सर्व माहिती


पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भीम या डिजीटल पेमेंट्स अ‍ॅपचे उद्घाटन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या अ‍ॅपला दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस आणि लेसकॅश व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अ‍ॅप सुरू केले आहे. भीम अ‍ॅप हे जुन्या यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) आणि यूएसएसडी (अस्ट्रक्चर्ड सप्लीमेंट्री सर्व्हिस डाटा) याचे पुढील व्हर्जन आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हे अ‍ॅप कसे डाऊनलोड करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा.

असे करावे Bhim App डाऊनलोड ः
– अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवर जावे किंवा या लिंकवर क्लिक करा.
– प्ले स्टोरवर bhim national payment टाईप करून सर्च करावे.
– अ‍ॅप डाऊनलोड करा आणि स्मार्टफोनमध्ये इस्टॉल करा.
– त्यानंतर अ‍ॅप ओपन करून आपल्या बँकमध्ये रजिस्टर असलेल्या मोबाईलनंतर टाकून लॉगिन करावे.
– त्यानंतर अ‍ॅपद्वारे आपण पैशांची देवाण-घेवाण करू शकता.

असा करावा Bhim Appचा वापर ः
– अ‍ॅप सुरू करून त्याचा पासवर्ड सेव्ह करावा.
– येथे आपल्याला send, request, scan & pay असे विकल्प दिसतील.
– ीशपव वर क्लिक करावे आणि ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईलनंतर डायल करून verify करावे.
– पुढील स्लाईड आल्यानंतर रक्कम आणि रिमार्क टाकून pay वर क्लिक करावे.
– त्यानंतर UPI पिन डायल करताच पैसे संबंधीत व्यक्तीच्या खात्यात जमा होतील.
– पैसे पाठविण्यासाठी फक्त एकदाच आपले बँक खाते रजिस्टर करावे आणि UPI पिन जनरेट करावा.
– इंटरनेट नसल्यास फोनवरून USSD कोड *99# डायल करूनही या अ‍ॅपचा वापर करता येऊ शकतो.

Leave a Comment