या आमदार साहेबांनी भौतिकशास्त्रातून मिळवली वाणिज्य शाखेची पदवी


नवी दिल्ली – बिहारमधील १२वीच्या टॉपर्सचा घोटाळा काही दिवसांपूर्वी उघड झाला असताना आता आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला असून चक्क गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय घेऊन एका आमदाराने वाणिज्य शाखेची पदवी मिळविल्याचे समोर आले आहे.

गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय आंध्रप्रदेशातील तेलगु देसम पार्टी (टीडीपी)चे आमदार जलील खान यांना प्रचंड आवडतात. एवढेच नाही तर त्यांनी गणित आणि फिजिक्स विषय घेऊन बी. कॉमची डिग्री घेतल्याचा दावा केला आहे. एका टीव्ही शोमध्ये हा दावा आमदार जलील खान यांनी केला आहे.

आमदार जलील खान यांना एका टीव्ही शो मध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता विचारली. आमदार जलील खान यांनी या प्रश्नाचे उत्तर देत म्हटले की, मी बी. कॉमची डिग्री घेतली आहे. त्यानंतर जे घडले त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. कारण, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्याने आमदार साहेबांना त्यांचे आवडते विषय विचारले यावर त्यांनी सांगितले की, गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय त्यांना खुप आवडतात. आमदार जलील खान यांनी दिलेले उत्तर ऐकूण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाला धक्का बसला. यामुळे त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला. तेव्हाही त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय खुप आवडत असल्याचा पुन्हा म्हटले. गणित विषय मला लहानपणापासून आवडतो आणि त्यात मला १०० पैकी १०० गुण मिळत होते.

Leave a Comment