मुकेश अंबानी वापरतात देशातील सर्वात महागडी कार


देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी हे केवळ महागड्या घरात राहतात असे नाही तर त्यांची कारही देशात सर्वात महागडी कार असून आपल्या बीएमडब्ल्यू ७६० एलआयमधून मुकेश अंबानी प्रवास करतात आणि देशातील सर्वात महागडी ही कार आहे. या कारमध्ये अनेक बदलही केले आहेत ज्यामुळे या कारची किंमतही अनेक कोटींनी वाढली आहे.

बीएमडब्ल्यू ७६० एलआय मध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे ही जगातील सर्वात सुरक्षित कार बनली आहे. मुंबईतील मोटर व्हिआयकल्स डिपार्टमेंटमध्ये मुकेश अंबानी यांनी १.६ कोटी रुपये नोंदणी शुल्क दिले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतामध्ये यापूर्वी कार नोंदणी करण्यासाठी कुणीही एवढे पैसे मोजले नाही.

१.९ कोटी रुपये ऐवढी बीएमडब्ल्यू ७६०एलआय या गाडीची ऑन रोड किंमत असून अंबानी यांची झेट सिक्युरीटी पाहता आणि त्यांच्या गरजेनुसार बीएमडब्ल्यूने कारमध्ये अनेक बदल केले आहेत. तसेच, आर्म्ड कारच्या इम्पोर्ट ड्युटीवर ३०० टक्के टॅक्स लागतो त्यामुळे या कारची किंमत ८.५ कोटी रुपये झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या आर्म्ड बीएमडब्ल्यू ७६० एलआय वीआर७ ब्लास्टिक प्रोटेक्शनसाठी तयार आहेत. या कारच्या डोर पॅनलमध्ये प्लेट्स आहेत. प्रत्येक विंडो ६५ एमएम जाड आणि १५० किलो वजनाच्या असुन बुलेट प्रूफ आहेत. या कारवर आर्मी ग्रेड हत्यार, हँड ग्रेड, १७ किलोग्राम वजनापर्यंत हाय इंटेन्सिटी ब्लास्टचा कुठलाही परिणाम होणार नाही.

सेल्फ सिलिंग केवलरने बीएमडब्ल्यूच्या फ्युअल टँकला बनविले आहे, ज्यामुळे कारमध्ये आग लागणार नाही. या कारवर केमिकल अटॅक झाल्यासही काही फरक पडणार नाही तसेच आपातकालीन परिस्थितीत कारमध्ये ऑक्सिजनचा वापरही करता येतो. या कारमध्ये डबल लेयर्सचे टायर्स लावण्यात आले आहेत ज्यामुळे बुलेट अटॅकचाही या कारवर कुठलाही परिणाम होणार नाही.

Leave a Comment