नोटबंदीनंतर आयकर विभागाने जप्त केला ४ हजार कोटींचा काळा पैसा


नवी दिल्ली- ४ हजार १७२ कोटी काळा पैसा नोटबंदीनंतर आयकर विभागाला आत्तापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये सापडला असून आयकर विभागाने ८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत ४ हजार कोटींचा काळा पैसा पकडला आहे. यापैकी १०५ कोटी रुपयांच्या नव्या नोटा मिळाल्या आहेत.

आत्तापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये आयकर विभागाला ४ हजार १७२ कोटी काळा पैसा सापडला. यामध्ये ४५८ कोटी रुपयांची रोकड तर ९१ कोटी किंमतीचे सोने मिळाले आहे. आयकर विभागाने ५०२७ नोटीस पाठवत ८ नोव्हेंबरपासून एकूण ९८३ धाडी टाकल्या आहेत. आयकर विभागाने २५४ प्रकरण ईडी कडे पाठवल्या असून २२३ प्रकरणांची चौकशी सीबीआय करणार आहे.

Leave a Comment