टाटा झेनॉन योद्धा ३ जानेवारीला लाँच


टाटा मोटर्स नव्या वर्षातले त्यांचे पहिले वाहन झेनॉन योद्धा ३ जानेवारीला लाँच करत आहे. टाटांची नव्या वर्षातली ही गाडी पिकअप ट्रक आहे. बॉलीवूडचा अभिनेता अक्षयकुमार याची कंपनीने व्यावसायिक वाहनांसाठी सदिच्छा दूत म्हणून नुकतीच निवड केली असून त्याच्या नावाची घोषणा या लाँचच्या वेळी केली जाईल असे सांगितले जात आहे.

या पिक अपमध्ये काही कॉस्मेटिक बदल केले गेले आहेत. नवीन ग्रिल, रियर बंपर, फॉग लँप, नवीन व्हिल बरोबरच इंटिरियर मध्येही नवीन डॅशबोर्ड, इंफोटेनमेंट, स्पोर्टी लूक असे बदल आहेत. या पिकअपसाठी २.२ लिटरचे डिझेल इंजिन असून मॅन्यअल व ऑटो ट्रान्समिशन अशा दोन्ही सुविधा आहेत. सफारी स्टॉर्म नंतर भारतीय लष्कर वापरणार असलेली टाटाची ही दुसरी गाडी आहे. टाटांची टियागो यशस्वी ठरल्यानंतर २०१७ मध्ये कंपनी नेक्सन, सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही हेक्सा व टाटा काईट पाच सेदान ही वाहनेही बाजारात लाँच करत आहे.

Leave a Comment