व्हायरस महिलांबाबत असतात जरा दयाळू ?


जगभरात महिला पुरूषांत होत असलेल्या भेदभावांबाबत चर्चा सातत्याने सुरू असतात. या चर्चांचा परिणाम विषाणू किंवा व्हायरस यांच्यावरही पडत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. विषाणू किंवा व्हायरस हे महिलांच्या बाबतीत जरा अधिक नरम असतात म्हणजे पुरूषांच्या तुलनेत महिलांना विषाणूंचा संसर्ग कमी प्रमाणात होतो असे लंडन रॉयल होलोवे विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसले आहे. हे संशोधन नेचर मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

वैज्ञानिकांना विषाणूंचे संक्रमण किती वेगाने होते हे तपासत असताना असे आढळले की महिलाच्या तुलनेत पुरूषांमध्ये हे संक्रमण अधिक वेगाने होते. त्याचा फायदा महिलांना नक्कीच मिळतो. कांही विषाणू तर महिलांसाठी कमी धोकादायक असतात.अगदी गरोदर महिलांतही काही विषाणू संक्रमित झाले तरी त्याचा धोका महिलांना फारसा राहात नाही मात्र पोटातील बाळाच्या जन्मावेळी या नवजात बालकांमध्ये हे विषाणू संक्रमित होऊ शकतात असेही दिसून आले आहे.

Leave a Comment