मेंढपाळाची पोर झाली शिक्षण मंत्री


नवी दिल्ली – फ्रान्सची पहिली महिला मंत्री म्हणून नजत बेल्कासम यांचे नाव घेतले जाते. नजत या मुस्लिम असून फ्रान्सच्या शिक्षण मंत्री देखील आहेत. दरम्यान त्यांच्या बाबत काही रोचक बातमी समोर आली आहे. मंत्री बनण्यापूर्वी नजत बेल्कासम या मेंढ्या पाळण्याचे काम करत होत्या. त्या जेव्हा राजकारणात आल्या तेव्हा त्यांच्या कपडे आणि लिपस्टिकवरून त्याच्यावर टीका केल्या जायच्या.

नजत बेल्कासमचे पालक १९८२ साली फ्रान्समध्ये आले. त्यावेळी त्यांच्या फ्रान्सचे नागरिकत्वदेखील नव्हते. हा परिवार फ्रान्सच्या बिन चिकार गावात रहात होते. त्यांचे वडील मजुरी करायचे तर घरातील बाकी सदस्य मेंढ्या पाळण्याचे काम करत होते. १९७७मध्ये जन्मलेल्या नजत यांना ६ भावंडे आहेत. नजत बेल्कासम जेव्हा १८ वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांना फ्रान्सचे नागरिकत्व मिळाले. नजत शिक्षणात देखील हुशार होत्या. नजत यांनी शिकत असतानाच राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात विरोधक त्यांच्या अश्लील टीका करायचे. कोणी धर्मावरून तर कोणी कपड्यावरून, तर कोणी लिपस्टिकवरून टीका करायचा. या परिस्थितीला न घाबरता पुढे जाण्याचे उद्धिष्ट नजत बेल्कासम यांनी आपल्यासमोर ठेवले. भेदभाव विरोधात त्यांनी आंदोलन देखील केले.

Leave a Comment