‘खिलाडी’ कुमार टाटाचा सदिच्छा दूत


नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहनांचा सदिच्छा दूत म्हणून निवड केली. टाटा मोटर्सच्या नव्या श्रेणीतील वाहनांच्या जाहिरातीसाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ओरिजिनल खिलाडी’ची निवड करण्यात आली. तो जानेवारी २०१७ पासून टाटाच्या जाहिरातींमध्ये दिसणार असल्याचे कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हणण्यात आले.

टाटा मोटर्सकडून आयोजित करण्यात आलेल्या उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठीच्या कार्यक्रमातही तो दिसणार आहे. यामध्ये नाविण्यपूर्ण वितरण आणि ग्राहक सेवांचा समावेश असेल. अक्षय कुमार याची व्यावसायिक वाहनांच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्याच्या लोकप्रियतेमुळे कंपनीच्या विक्रीमध्ये भविष्यात चांगली वाढ होईल असे व्यावसायिक वाहन विभागाचे प्रमुख रविंद्र पिशारोडी यांनी म्हटले. भारतीयांमध्ये टाटा हा एक विश्वसनीय ब्रॅन्ड आणि कंपनीबरोबर जोडला गेल्याचा आपल्याला सन्मान वाटतो. भारतात ट्रक व्यवसायासंबंधी टाटाव्यतिरिक्त कोणत्याही कंपनीला अधिक माहिती नाही, असे अक्षय कुमार याने माध्यमांसमोर म्हटले.

Leave a Comment