करन्सी प्रेसमध्ये एका दिवसात नोटांची विक्रमी छपाई


नाशिक : एका दिवसात नाशिकच्या सिक्युरिटी प्रेस आणि मध्य प्रदेशच्या देवास प्रेसमध्ये नोटांची विक्रमी छपाई झाली असून या प्रेसमध्ये ३ कोटी ७५ लाखांच्या नोटा छापण्यात आल्या असून यामध्ये २ कोटी ६५ लाख पाचशेच्या नोटा आहेत. देशात नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्यामुळे पुढील काही दिवस या प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटा छपाईचे काम सुरु राहणार आहे.

देशातील नोटांची छपाई नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी होते. २ हजारांच्या नोटांशिवाय सर्व छोट्या चलनाच्या नोटाही नाशिक आणि देवासमध्ये छापल्या जात आहेत. तर म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील प्रेसमध्ये केवळ २ हजार आणि ५०० च्या नोटा छापल्या जातात.

Leave a Comment