
आता तुम्ही मराठी, हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ, पंजाबी, तेलगु, चायनीज आणि अरबी भाषेतही तुमचा ईमेल आयडी बनवू शकता. देशातील पहिली ईमेल सेवा देणाऱ्या डेटामेलने ही सेवा वेब ब्राउजरसाठी सुरु केली आहे. ही सेवा पूर्णतः मोफत आहे.
आता मराठीसह ८ प्रादेशिक भाषांमध्ये बनवा ईमेल आयडी
या सेवेचा क्रोम, फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, एज आणि ऑपेरा सारख्या सर्व ब्राउजरवर वापर करता येऊ शकतो. आगामी काळात डाटा एक्सजेन टेक्नोलॉजीस प्राइवेट लिमिटेडकडून २२ भाषांमध्ये ईमेल आयडी बनवण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. डेटामेल अॅप हे तुम्ही कोणत्याही अँड्रॉईड आणि आयओएस मोबाईलवरून प्ले स्टोरमधून डाउनलोड करू शकता.
