सॅमसंग एस ७ एज गुलाबी रंगातही उपलब्ध


सॅमसंगने त्यांचा अत्याधुनिक स्मार्टफोन गॅलेक्सी एस सेव्हन एज नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने भारतात गुलाबी रंगात सादर केला आहे. भारतात या फोनची किंमत ५०९०० रूपये आहे. यापूर्वी एज सेव्हन कोरल ब्ल्यू कलर व्हेरिएंटमध्येही भारतात आला आहे. म्हणजे आता ब्लॅक, कोरल ब्ल्यू, गोल्ड प्लॅटिनम, पिक गोल्ड, सिल्व्हर टायटेनियम अशा रंगात हा फोन उपलब्ध झाला आहे.

या फोनसाठी ५.५ इंची क्यूएचडी सुपर एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. हा हायएंड स्मार्टफोन आयपीईएल सर्टिफाईड म्हणजे धूळ व पाणी प्रतिरोधक व ऑलवेज ऑन डिस्प्ले फिचर सह आहे. डिस्प्ले दोन्ही कडांवर कर्व्ह आहे. फोनला १२ एमपीचा ड्यूल रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. ४ जीबी रॅम असून हा फोन ३२ व ६४ जीबी अशा दोन व्हेरिएंटमध्ये आहे. मायक्रोकार्डने त्याची मेमरी २०० जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधाही दिली गेली आहे.

Leave a Comment