६७ वर्षाच्या आजीने दिला नातीला जन्म


जगातील सर्वात वयोवृद्ध सरोगेट मदर बनण्याचा नवा विक्रम ग्रीसमधील अनस्तानिया ओंदू या महिैलेने केला असून तिच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये होऊ शकते असे समजते. या महिलेने नातीला जन्म दिला आहे व ती म्हणते, आई होण्यापेक्षा आजी बनल्याचा मला अधिक आनंद आहे. माझ्या मुलीला आई बनता येणार नाही हे नक्की झाल्यानंतर तिच्या आनंदासाठी मी सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय अजिबात सोपा नव्हता कारण माझे वय जास्त आहे.

मेडिकल टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार अनास्तानिया ने वयाच्या ६७ व्या वर्षी मुलीला सरोगसीने जन्म दिला असून साडेसात महिन्याच्या प्रेगन्सीनंतर या मुलीचा जन्म झाला. यापूर्वी सरोगसी मदर बनण्याचा विक्रम मारिया डेल कार्मेन हिच्या नावावर असून तिने २००६ मध्ये बार्सिलोना येथे ६६ वर्षे ३५८ दिवस या वयात जुळ्या मुलांना जम्म दिला आहे. २००९ साली तिचे कॅन्सरने निधन झाले आहे.

Leave a Comment