व्होल्व्होची लाल किल्ली करेल तुमच्या कारची सुरक्षा

redkey
व्होल्व्होने त्यांच्या कारमध्ये अॅडव्हान्स सेफ्टी फिचर देतानाच आणखी एक नवे सेफ्टी फिचर लाँच केले आहे. रेड की नावाने लाँच केले गेलेले हे फिचर म्हणजे लाल रंगाची किल्ली आहे. ही किल्ली कोणत्याही धोक्यापासून कारचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. सध्या हे फिचर ब्रिटनमध्ये एस ९०, चव्ही ९०, एक्स सी ९०, या कारसाठी उपलब्ध केले गेले असून त्याची किंमत आहे ११० पौंड.

अनेकदा आपली कार दुसर्‍यांना वापरायला देण्याची पाळी येते व अशावेळी संबंधित व्यक्ती कार कशी वापरेल, कांही धोका तर होणार नाही ना अशी शंका येत राहते. यावेळी ही किल्ली उपयुक्त ठरणार आहे.या किल्लीमुळे कार चालू शकेल पण तिचा टॉप स्पीड आपोआपच कमी होईल. अॅडाप्टीव्ह क्रूझ कंट्रोल सिस्टीम पुढच्या कारपासून सुरक्षित अंतर ठेवेल व म्युझिम सिस्टीमचा आवाजही नियंत्रणात ठेवेल. शिवाय ब्लाईंड स्पॉट इन्फर्मेशन सिस्टीम, लेन किपिंग, वॉर्निंग सिस्टीम, ड्रायव्हर अॅलर्ट कंट्रोल, ट्रॅफिक संकेत सिस्टीमही ऑन राहील. परिणामी कारला अपघात होण्याच्या बहुतेक सर्व शक्यता संपुष्टात येतील.