
मुंबई : सध्या एकमेकांपासून लांब असलेल्या लर्व्हबर्डसनी एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅटिंग, व्हिडिओ कॉल्स, वेब कॅम अशा अत्याधुनिक सोयीसुविधांचा आधार घेतला आहे. त्यामधून रिअल टाइममध्ये एकमेकांशी गप्पा मारता येत असल्या आणि एकमेकांचे दर्शन होत असले तरी भावभावनांचा ओलावा जाणवत नव्हता. आता ही अडचण लवकरच दूर होणार असून अशा लव्हबर्डस्साठी किसिंजर नावाचे नवे अॅप्लिकेशन येणार असून प्रियकराला आपल्या प्रेयसीला त्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीणे किसही पाठवण्यात येणार आहे.
लव्हबर्डस्च्या फ्लाइंग किसची समस्या सोडवणार नवे अॅप्लिकेशन
एका प्लास्टिक पॅडला आपण ओठांनी किस करायचे आणि त्या भावना एप्लिकेशनच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला पाठवायच्या. विशेष म्हणजे तो किस जगात कुणालाही पाठवता येईल. त्याबाबत लंडन विद्यापीठात संशोधन सुरू असून हा प्रयोग यशस्वी झाला तर यापुढे कुणालाही आपल्या लाडक्या व्यक्तीला फ्लाईंग किस देण्याची गरज भासणार नाही.
