ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे ‘रिश्‍वतखोर_PM_Modi’

modi1
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडियावर आज याच विषयावर चर्चा सुरू असून ट्विटरवर ‘रिश्‍वतखोर_PM_Modi’ हा विषय ‘टॉप ट्रेण्ड’मध्ये दिसून येत आहे.

बुधवारी गुजरातमधील जाहीर सभेत राहुल यांनी बोलताना मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर या विषयाची सोशल मिडियावरही चर्चा सुरू अहे. आज सकाळी ट्विटरवर याच विषयाचा ‘रिश्‍वतखोर_PM_Modi’ असा ट्रेण्ड आढळून येत आहे. याशिवाय, #pmshouldresign असाही विषय आज चर्चेत आहे. त्यावर नेटिझन्स प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Leave a Comment